बारामती संपवायला अनेक जन्म घ्यावे लागतील,धनंजय मुंडेंचा पलटवार

October 11, 2016 10:57 PM1 commentViews:

11 ऑक्टोबर : स्वत:च्या प्रसिद्धीसाठी महादेव जानकर हे बारामतीवर टीका करताय. पण बारामती संपवायला असे अनेक जन्माला यायला लागतील असं सणसणीत उत्तर राष्ट्रवादीचे नेचे धनंजय मुंडे यांनी महादेव जानकरांना दिलंय.

munde_vs_jankarमहादेव जाणकरांनी भगवानगडावरच्या भाषणात धनंजय मुंडे आणि अजित पवारांवर एकच हल्लाबोल केला होता. . बारामतीच्या चमच्याने पंकजा मुंडेंच्या विरोधात षडयंत्र रचलंय. भगवान बाबांची शपथ घेऊन सांगतो या ‘बारामती’ची वाट लागल्याशिवाय जानकर थांबणार नाही. बारामतीची सुपारी घेणाऱ्या परळीच्या चमच्या वाट लावल्याशिवाय राहणार नाही अशी शिवराळ भाषेत टीका केली होती. आयबीएन लोकमतशी बोलतांना धनंजय मुंडेंनी महादेव जानकरांना उत्तर दिलं. बारामती संपवायला असे अनेक जन्म घ्यावे लागतील असा पलटवार मुंडेंनी केला. तसंच तुम्ही सत्तेत आला आहे मग धनगर आरक्षणाचं काय झालं असा सवालही केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Sandip Andhale

    jankar sheb je bolle te kahi chukiche navte ,,,dhannjay munde saheb ,,tanchi layki kadhnear tumhi ,,baramatichya tukdyawar jagta ,,ani te pan tumhala fakt pankaj tai aahet mhanun postat nahitar zp member honyachi layki nahi tumchi,,,jankar saheb aaj cabinaet min aahet.jya thalit jewle tya thalit ched kela tumchi lokana kai sikwnar.aao….naitiktechi bhasha tumhala kai kalnar.