मालेगावात आग, एक कोटींचे नुकसान

April 23, 2010 1:28 PM0 commentsViews: 3

23 एप्रिल

मालेगावातील सोयगावमध्ये पारस प्रोव्हीजनला लागलेल्या आगीत 1 कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

सोयगावमधील हे सर्वात मोठे गोडाऊन आहे. यामध्ये गोडेतेल, कच्चा किराणा, साबण, सुकामेवा असा माल होता.

ही आग विझवण्यासाठी मालेगावसह धुळे, सटाणा, मनमाड या शहरांमधील 70 अग्निशामक गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.

आगीचे कारण कळू शकलेले नाही.

close