ठाण्यात साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

October 12, 2016 10:16 AM1 commentViews:

Rape masda

12 ऑक्टोबर : घरात कोणीही नाही याचा फायदा घेत एका तरुणाने अवघ्या साडेचार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील किसननगर भागात साईनाथवाडी चाळीत राहणाऱ्या आईने तिच्या पीडित) मुलीला घरात ठेवून बाहेरून कडी लावली आणि भाजी आणण्यासाठी बाजारात गेली. त्यावेळी पीडित मुलीच्या शेजारी राहणारा आरोपी शिवाजी धाडवे (२४) याने तिच्या घराची कडी उघडून तिला स्वतःच्या घरी नेले. त्यानंतर स्वतःच्या घराच्या पोटमाळ्यावर नेत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर घरी गेलेल्या पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला.

अखेर पोलिसांनी आरोपी शिवाजी याला अटक केली. आरोपी धाडवे हा युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याचीही माहिती मिळतेय. चिमुकलीला उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Satish Bhangaonkar

    HANG THAT BASTERED IMMEDIATELY