पम्पोरमध्ये चकमक संपली; 2 दहशतवादी ठार

October 12, 2016 6:31 PM0 commentsViews:

Pampore2131

12 ऑक्टोबर :  काश्‍मीरमधील पम्पोर भागातील एका सरकारी इमारतीमध्ये लपलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलांदरम्यान सुरू असलेली चकमक आज (बुधवारी) तिसऱ्या दिवशी तब्बल 56 तासांनंतर संपली. या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी 2  दहशतवाद्यांचा खात्मा केला.

सोमवारी पहाटेच्या सुमारास दोन ते तीन दहशतवादी ईडीआय इमारतीत घुसले होते. तेव्हापासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरू होती. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला होता. मंगळवारी रात्री आणि आज पहाटे असे दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आलं आहे. दरम्यान, मंगळवारी शोपियाँ येथे दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एक जवानासह सात जण जखमी झाले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा