पंतप्रधान झाल्यापासून मोदी 24×7 आॅन ड्युटी!

October 12, 2016 1:43 PM0 commentsViews:

pm modi33

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदभार स्वीकारल्यापासून एकही सुटी घेतलेली नाही. ते 24×7 आॅन ड्युटी असतात, अशी माहिती खुद्द पंतप्रधान कार्यालयानंच दिली आहे. तसंच माजी पंतप्रधानांनी घेतलेल्या सुट्ट्यांची कोणतीच नोंद आपल्या कार्यालयाकडे उपलब्ध नाही, असंही पंतप्रधान कार्यालयाने आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

एका अर्जदाराने देशाच्या पंतप्रधानांच्या रजांसंबंधी नियम आणि प्रक्रिया यांची प्रत पंतप्रधान कार्यालय तसंच मंत्रिमंडळ सचिवालयाकडून माहिती अधिकाराअंतर्गत मागवली होती. त्याच्या उत्तरादाखल पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली.

माजी पंतप्रधानांनी कधी सुट्टी घेतली होती का आणि त्याच्या काही नोंदी आहेत का, अशी विचारणाही या अर्जदाराने केली होती. त्यावर ‘माजी पंतप्रधानांनी घेतलेल्या सुट्ट्यांचा या कार्यालयाकडून ठेवल्या जात असलेल्या नोंदींमध्ये समावेश नाही. मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार हाती घेतल्यापासून सुट्टी घेतलेली नाही, हे सांगता येईल,’ असं उत्तरात म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा