प्रज्ञा दया पवार आणि रावसाहेब कसबेंना धमकावलं

October 12, 2016 3:39 PM0 commentsViews:

Pradnya Pawar12312

12 ऑक्टोबर : महाराष्ट्रात काल राजकीय दसर्‍याचा धुराळा उडालेला असतानाच सोशल मीडियावर वादळ सुरू होतं ते प्रज्ञा दया पवार आणि ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्यासोबत पाटनमध्ये घडलेल्या घटनेचं.

पाटनमध्ये मसापचं विभागीय साहित्य संमेलन भरवलेलं होतं. त्याच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा दया पवार होत्या. त्यांच्या अध्यक्षीय भाषणावरून मतभेद झाले आहेत. भाषण झाल्यानंतर त्याच रात्री शंभर एक जणांचा जमाव प्रज्ञा दया पवार यांच्या खोलीजवळ गेला आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत राहीला. एवढंच नाही तर प्रज्ञा दया पवार आणि रावसाहेब कसबे यांना तातडीनं संमेलन सोडायला लावलं.

याबद्दल आयोजकांनीही काहीच भूमिका घेतली नाही असा आरोपही प्रज्ञा दया पवार यांनी केला आहे. ह्या संमेलनाचे अध्यक्ष विक्रमसिंह पाटणकर होते. लेखिका प्रज्ञा दया पवार यांच्या अध्यक्षीय भाषणात मराठा मोर्चे, नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तिखट शब्दात सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. त्यावरूनच टोळक्यानं प्रज्ञा दया पवार यांना हाकलल्याचं सांगितलं जातं आहे.

दरम्यान, पाटनचे आमदार शंभूराजे देसाई यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रज्ञा दया पवार यांच्या भाषणातील मुद्दा

आज मराठा समाज मोर्चे काढत आहे. प्रत्येक मोर्चात लोकसहभागाचे नवनवे रेकॉर्डस निर्माण केले जात आहेत. पण ह्या मोर्चाचे मुद्दे काय आहेत? कोपर्डीतील बलात्काराचे प्रकरण हा पहिला. कोपर्डीबद्दल एकच मुद्दा मांडते आणि पुढं जाते. ज्या नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात दलित अत्याचाराची माणुसकीला काळीमा फासणारी अनेक प्रकरणे घडली. त्या प्रकरणांबद्दल ह्या मोर्चांना काहीच म्हणायचे नव्हते आणि नाही. खैरलांजीबद्दल काहीच म्हणायचे नाही. मराठा सोडून अन्य स्त्रियांबद्दल, त्यांच्या इभ्रतीबद्दल मराठा नेतृत्वाला काहीच भूमिका नाही? आमच्या त्या सगळ्या जिजाऊच्या लेकी, इज्जतदार बायका, आणि दुसर्‍यांच्या बायका म्हणजे काय फक्त ‘वाड्यावर या’व्यात म्हणून कसे चालेल?

प्रज्ञा दया पवार यांच्या भाषणातील इतर मुद्दा

- आरएसएस सांस्कृतिक राष्ट्रवादातून सांस्कृतिक दहशतवाद पोसतंय मराठा मोर्चांनी लेखकांकडून मराठ्यांच्या योग्य चित्रणाची मागणी करणं भयावह.

- मुस्लिमांचे शिरकाण ही एकमेव ऐतिहासिक कामगिरी करत मोदी पंतप्रधानपदी शरद पवारांनी साहित्य संमेलनातून साहित्य हटवलं, राजकीय इव्हेंट केला.

- गेल्या 2 वर्षात हत्या, मारहाणी,गुंडगिरी त्यात गावगुंड ते केंद्रीय मंत्री सहभागी भांडारकर हल्ला दिवस मराठा संघटनांसाठी भांडारकर हल्ला दिवस मराठा संघटनांसाठी सांस्कृतिक दहशतवाद दिन.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा