छगन भुजबळ जेजेतून पुन्हा जेलमध्ये

October 12, 2016 4:07 PM0 commentsViews:

bhujbal_arrested12 ऑक्टोबर : मनी लाँड्रिंग प्रकरणी कोठडीत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आलीये.

छगन भुजबळ यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मध्यंतरी भुजबळांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला पण कोर्टाने तो फेटाळून लावला होता. आज 3 आठवड्यानंतर जेजे रुग्णालयातून भुजबळांना डिस्चार्ज देण्यात आला. जेजेतून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर भुजबळांना पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आलीये. भुजबळांच्या वोल्टा मॉनिटर, थॅलियम स्कॅन, इलेक्ट्रो फिजिओलॉजी या चाचण्या बाकी आहे. तसंच हृदयाशी संबंधित चाचण्यासह या चाचण्याची जेजेमध्ये सोय उपलब्ध नसल्यानं कुठल्या रुग्णालयात चाचण्या करायच्या याचा निर्णय जेल प्रशासन घेणार आहे. तोपर्यंत त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा