जयललितांच्या गैरहजेरीत ओ.पन्नीरसेल्वमांकडे पदभार

October 12, 2016 8:21 PM0 commentsViews:

jaylalita323 12 ऑक्टोबर : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या जागी ओ. पन्नीरसेल्वम यांची नियुक्ती करण्यात आलीय.

पण जयललिता याच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आहेत, असं त्यांच्या अण्णा द्रमुक पक्षाने जाहीर केलंय. जयललिता यांच्या गैरहजेरीत ओ. पन्नीरसेल्वम हे कॅबिनेटच्या बैठका घेतायत. त्यामुळेआता ओ. पन्नीरसेल्वम हेच तामिळनाडूचा कारभार सांभाळतील, अशी शक्यता आहे.

ओ. पन्नीरसेल्वम यांचा राजकीय प्रवास
ओ. पन्नीरसेल्वम हे जयललितांचा उजवा हात मानले जातात.
2001- 2002 मध्ये जयललितांना निवडणूक लढवण्याची बंदी असताना पन्नीरसेल्वम हेच मुख्यमंत्री होते.
जयललितांच्या मंत्रिमंडळात पन्नीरसेल्वम यांनी महत्त्वाची पदं सांभाळली.
2014 – 2015 मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जयललितांना तुरुंगवास झाल्यावर पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री झाले.
2016 च्या निवडणुकांनंतर पन्नीरसेल्वम यांच्याकडे अर्थमंत्रिपद होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा