असंही सीमोल्लंघन !,अंबाबाईचा मंदिरात कैद्यांच्या केलेले 1.75 लाख लाडू वाटले

October 12, 2016 9:01 PM0 commentsViews:

mahalaxmi_prasadकोल्हापूर, 12 ऑक्टोबर : कैद्यांमधील माणसाला प्रवाहात आणण्याचं एकाप्रकारे सीमोल्लंघन कोल्हापूरच्या करवारीनिवासिनींचा दरबारात घडलं. शारदीय नवरात्रोत्सव कोल्हापूरमध्ये पार पडला. पण याच नवरात्रोत्सवामध्ये तब्बल पावणे दोन लाख लाडू प्रसाद म्हणून भाविकांना देण्यात आले. हे लाडू बनवले होते तुरुंगातल्या कैद्यांनी…

अंबाबाईचा प्रसाद कारागृहातल्या बंदीजनांकडून बनवून घ्यायचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं घेतला होता. या निर्णयावर टीकाही झाली. तरी देवस्थान समिती या निर्णयावर कायम राहिली. गेल्या 4 महिन्यांमध्ये या कैद्यांनी सुमारे 4 लाख लाडू तयार केले. नवरात्रीच्या काळात तर तब्बल पावणेदोन लाख लाडू तयार करण्यात आले होते. भाविकांची संख्या लक्षात घेता कैद्यांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात लाडू प्रसादाचा पुरवठा होणार की नाही याबाबत साशंकता होती. पण कैद्यांनी उत्तम दर्जाचे लाडू भाविकांपर्यंत पोहोचवून आपली कार्यक्षमता सिद्ध केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा