मातीशिवाय होते शेती !

October 12, 2016 9:45 PM0 commentsViews:

12ऑक्टोबर : शेती करायची तर जमीन हवी आणि पाणी हवं. पण वाढती लोकसंख्या आणि जागेची कमतरता यामुळे शेती करायची कुठे ? असा प्रश्न आधुनिक काळात सगळ्यांना पडणार आहे. यावर उत्तर म्हणून जगभरातल्या विकसित देशांमध्ये सध्या व्हटिर्कल फामिर्ंगचा ट्रेंड आलाय. ही शेती कमीत कमी मातीत आणि कमीत कमी पाण्यात होऊ शकते. अशा प्रकारची शेती केली जाते तीही उंच इमारतींमध्ये. या इमारतींमध्ये लांबच लांब शेल्फ उभारून त्यात भाजीपाला पिकवला जातो. नियंत्रित तापमानात ग्रीनहाऊस पद्धतीने फुलशेती किंवा भाज्यांची शेती केली जाते तशीच ही शेती आहे.

व्हटिर्कल शेतीमध्ये माती आणि पाण्याची 95 टक्के बचत होते, असा शेतीतज्ज्ञांचा दावा आहे. काचेच्या उंच इमारतींमध्ये ही शेती केली जाते. त्यामुळे सूर्यप्रकाशही भरपूर मिळतो. शेल्फमध्ये लावलेल्या भाजीपाल्याला पाणी देणं, त्याची कापणी करणं या सगळ्या गोष्टी अद्ययावत यंत्रांनी केल्या जातात. त्यामुळे या शेतीत आथिर्क गुंतवणूक मात्र मोठ्या प्रमाणात करावी लागते.

अमेरिका, युरोपीय देश आणि जपानमध्येही व्हटिर्कल फामिर्ंगचा ट्रेंड वाढतोय. बेल्जियममध्येही नुकताच असा एक प्रयोग यशस्वी झालाय. एलईडी लाइट्सच्या मदतीने लेट्युसच्या रोपांना वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यात आलं. लेट्युससारखी पोषण मूल्य असलेली पालेभाजी पाश्चात्य देशात जास्त प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे लेट्युसला चांगली मागणी असते आणि भावही चांगला मिळतो.

भारतातही बंगलोरसारख्या मेट्रो सिटीमध्ये अशा व्हटिर्कल फार्मचे प्रयोग झालेत. पण अजूनही अशा प्रकारची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात नाही. उंच इमारतींमध्ये छपराखाली केलेली ही शेती फायदेशीर तर आहेच शिवाय यात नैसगिर्क आपत्तीचाही धोका नाही. दुष्काळ,अतिवृष्टी, गारपीट यामुळे भाजीपाल्याच्या शेतीचं मोठं नुकसान होतं. असं नुकसानही यामुळे टाळता येऊ शकेल.

बंदिस्त इमारतीत अशा प्रकारची शेती केली जाऊ शकते. पण मनोऱ्यासारख्या रचनेत खाचा तयार करून त्यातही शेती करण्याची कल्पना पुढे येतेय. अशा शेतीला भरपूर सूर्यप्रकाश मिळू शकतो. ही शेती खऱ्या अर्थाने ‘व्हटिर्कल फामिर्ंग’ आहे. ही कल्पना प्रत्यक्षात आली तर शहराच्या अगदी मध्यभागीही पालेभाज्यांची उंच इमारत दिसू शकते !


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा