मनसे आमदारांचे आंदोलन

April 23, 2010 2:36 PM0 commentsViews: 1

23 एप्रिल

निलंबनाची कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी आज मनसेच्या आमदारांनी विधानभवनात आंदोलन केले.

यासंदर्भात सत्तारुढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेऊन सभागृहात यासंदर्भात ठराव आणला जाईल. त्यानंतरच त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मराठीत शपथ घेण्यावरून सपाचे आमदार अबू आझमी यांना या आमदारांनी सभागृहात मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिशिर शिंदे, राम कदम, रमेश वांजळे, आणि वसंत गिते या चार आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली होती.

या आमदारांच्या मतदारसंघातील 12 लाख मतदारांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आता हे निलंबन रद्द करावे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. त्याला एकनाथ खडसे यांनी समर्थन करत चार वर्षाची शिक्षा कठोर आहे असे म्हटले.

close