विरोधी पक्ष नेतेपदावरून सेना आक्रमक

April 23, 2010 2:43 PM0 commentsViews: 4

23 एप्रिल

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावरून शिवसेना आज सभागृहात आक्रमक झाली.

शिवसेनेचे सभागृहात सध्या 9 सदस्य आहेत. तर भाजपचे 8 सदस्य आहेत. शिवसेनेचे आमदार जास्त असल्याने शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली होती. यासंदर्भातील पत्र विधान परिषद सभापतींना शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते यांना लिहीले होते.

त्याला विधानभवन सचिवांनी उत्तर दिले. या उत्तरातील दोन मुद्यांना शिवसेनेचा आक्षेप होता. यात भाजपकडे विरोधीपक्षनेतेपद राहणार असे उत्तर असल्याने शिवसेनेचे सर्व आमदार आक्रमक झाले. त्यामुळे त्यांनी उरलेल्या अधिवेशनावर बहिष्कार घातला.

close