पवारांच्या फोटोवर शाईफेक करणाऱ्या रासप कार्यकर्त्याला बेदम मारहाण

October 12, 2016 10:13 PM0 commentsViews:

12 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आज जनवाड़ी पोलीस चौकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या एका कार्यकर्त्यांला बेदम मारहाण केली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या एका कार्यकर्त्याने पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या फोटोवर शाईफेक केल्याच्या निषेधात ही मारहाण करण्यात आली.baramati_saifek

जानकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंगणे येथील जानकर यांच्या कार्यल्यावर हल्ला करुन तोड़फोड़ केली होती. त्यांच्या निषेधात आज रासपच्या एका कार्यकर्त्यांनी बारामती हॉस्टेल येथे जाऊन शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या फोटो वर शाई फेक केली. शाई फेक करणाऱ्या आरोपीला बारामती हॉस्टेलच्या प्रशासनानी जनवाड़ी पोलीस चौकीच्या ताब्यात दिलं. यावेळी संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा