नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता,इंटरनेट सेवा बंदच !

October 13, 2016 1:22 PM0 commentsViews:

nashik_internet13 ऑक्टोबर : नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. इंटरनेट, मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. तसंच शाळा, कॉलेजेसही बंद ठेवण्यात आले आहे. आज या बंदचा चौथा दिवस उजाडला आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा झाल्यामुळे जनक्षोभ उसळला होता. ठिकठिकाणी वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून गेली काही दिवस नाशिक आणि परिसरातली इंटरनेट सेवा बंद केली आहे. अनेक भागात बस सेवा बंद आहे तर शाळा कॉलेजेसलाही सुट्टी आहे. इंटरनेट बंद असल्यानं उद्योगाला मोठा फटका बसला आहे. एस.टी. महामंडळाचंही कोट्यवधींचं नुकसान होतंय. अफवा पसरवल्या जावू नयेत यासाठी ही तात्पुरती इंटरनेट बंदी केल्याचा दावा प्रशासनानं केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा