खेद व्यक्त करतो पण पवारांची माफी मागणार नाही -महादेव जानकर

October 13, 2016 1:37 PM0 commentsViews:

 bhgvangad_dasra_melva_pankaja_munde (20)
13 ऑक्टोबर : राज्यमंत्री महादेव जानकर यांनी भगवानगड दसरा मेळाव्यात केलेल्या विधानावर खेद व्यक्त केलाय. कुणाचं मन कलुशीत झालं असेल तर मी माफी मागतो, असा माफीनामा जानकरांनी सादर केला. पण अजित पवार, शरद पवार किंवा धनंजय मुंडेंची माफी मागणार नाही असंही जानकरांनी स्पष्ट केलं.

भगवानगडाच्या पायथ्याशी पार पडलेल्या दसरा मेळाव्यात राज्यमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली होती.परळीचा चमचा असा धनंजय मुंडेंचा उल्लेख केला होता. तर बारामतीचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही असा निर्धारच जानकरांनी केला होता. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रान उठवले होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ही हे असंस्कृत आणि बेजबाबदार भाषण होते अशी टीका केली होती. अखेर जानकरांनी शब्द दिल्याप्रमाणे तिस•या दिवशी मौन सोडले. माझ्या विधानाचं भांडवलं केलं गेलं. मुळात भ्रष्टाचाराचं मूळ हे कुठे आहे हे सर्वांना ठाऊक आहे. ग्रामीण भागात जो शब्द वापरला तोच मी वापरला त्यात गैर काय असा खुलासाच जानकरांनी केला. माझ्या वक्तव्याचा अर्थ चुकीचा लावल्यामुळे लोकांची मन कलुशीत झाले असेल तर खेद व्यक्त असं जानकर म्हणाले.

महादेव जानकरांना खेद

खंडेरायाची शपथ, मी गरीबांचा प्रतिनिधी आहे बलाढ्यांशी लढा देतो पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही. भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारे आणि त्यावर राज्य करणा•यांना जो ग्रामीण रूढ शब्द आहे, तो वापरला. वाटल्यास सर्व शब्दकोशात तपासावा. गेल्या अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराचे मूळ कोठे आहे हे जगाला माहित आहे. या आशयाचे मी काय अनेक लोक अनेकदा भाषणात बोलले. आताच भगवान गडावरील भाषणाचे एवढे भांडवल झाले हे विशेष वाटते.

सिंचन घोटाळा महाराष्ट्रातील लोकांच्या दुःखाचे मूळ आहे. यात कोण आहे हे सर्वज्ञात आहे. राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो. ते माझ्या ग्रामीण लोकांच्या वावरातून आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यातून शक्य झाले. मी कोणाला वैयक्तिक दुःखावण्यासाठी हे बोललो नाही. विपर्यास झाला हे मात्र वाईट.अर्थ चुकीचा लावल्याने महाराष्ट्रातील लोकांचे मन कलुशीत झाले असेल तर याबद्दल खेद व्यक्त करतो.-महादेव जानकर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा