शिवसैनिकांनी माझ्या खुनाचा कट रचला होता, सोमय्यांचा आरोप

October 13, 2016 2:46 PM0 commentsViews:

kirit somaiywewbaeमुंबई, 13 आॅक्टोबर : शिवसैनिकांनी माझा खून करण्याचा कट रचला होता आणि दसऱ्याला त्याच हेतूनं माझ्यावर हल्ला झाला असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. याबाबत सोमय्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
दसऱ्याच्या दिवशी मुलुंडमध्ये रावण दहानावरून शिवसेना आणि भाजपमध्ये ‘रामायण’ घडलं. भाजपने मुंबई महापालिकेतील भष्टाचाराचा प्रतिकात्मक रावण दहणाचा कार्यक्रम ज्या मैदानात आयोजित केला होता. त्याच मैदानात भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या समोरच, शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईल राडा केला. मुलुंडमध्ये राडा करणाऱ्या ११ शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केलीय.
मात्र, किरीट सोमय्यांनी शिवसेनेनं पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. शिवसैनिकांनी माझ्या खूनाचा कट रचला होता असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला. याबद्दल त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना पत्र लिहिलंय. आणि हल्यामागचा मास्टरमाईंड कोण त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही सोमय्यांनी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा