जेएनयूत पुन्हा राडा, मोदींचा पुतळा रावण म्हणून जाळला

October 13, 2016 12:49 PM0 commentsViews:

jnu_modi33दिल्ली,13 ऑक्टोबर : नवी दिल्लीच्या जेएनयूमध्ये पुन्हा तणाव निर्माण झालाय. काँग्रेसची विद्यार्थी आघाडी एनएसयूआयनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा रावण म्हणून जाळला. मोदींविरोधात त्यांनी वादग्रस्त घोषणाबाजीही केली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एनएसयूआय नं व्हिडिओची जबाबदारी स्वीकारली. या घटनेमुळे जेएनयूमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय.

नवी दिल्ली जवाहरलाल नेहरु विद्यापीठात कन्हैयालालचा वाद शमल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. एनएसयूआय विद्यार्थी संघटनेनं नरेंद्र मोदींचा पुतळा रावण म्हणून जाळला. या 10 तोंडी पुतळ्यात अमित शाह, बाबा रामदेव, आसाराम बापू यांचे मुखवटे लावण्यात आले होते. या प्रकरणामुळे कुलगुरुनी चौकशीचे आदेश दिले आहे. नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासनं पाळली नाही. लोकांना खोटं बोलण्यात आलंय. जी लोकं देशहिताच्या विरोधात आहे त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार असं एनएसयूआय चे जेएलयू अध्यक्ष ऐजाज अली शाहने स्पष्ट केलं. दरम्यान, विद्यापीठाने या संघटनेच्या सर्व सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा