गोव्याच्या इफ्फीमध्ये टॉप 10 मराठी सिनेमे ‘सैराट’

October 13, 2016 4:38 PM0 commentsViews:

iffi_sairat11 ऑक्टोबर: जगाला याड लावणारा ‘सैराट’ आणि नाना पाटेकर यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेला ‘नटसम्राट’ या सिनेमांचं बहुमान आंतराष्ट्रीय व्यासपीठावर होणार आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये सैराट, नटसम्राटसह मराठीतील टॉप 10 सिनेमांचं स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबरमध्ये गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी रंगणार आहे. इफ्फीचं हे 47वं वर्ष आहे. आणि यावेळी दहा मराठी सिनेमांचं स्क्रीनिंग इफ्फीमध्ये होणार आहे. कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, सैराट, हलाल, कोती, सहा गुण, हाफ तिकिट, दगडी चाळ हे सिनेमे रसिकांना पाहायला मिळतील. याशिवाय स्क्रीनिंगच्या दिवशी सिनेमातले कलाकारही तिथे उपस्थित असतात. प्रेक्षकांना त्यांच्याशीही संवाद साधता येणार आहे. 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा चित्रपट महोत्सव सुरू असणार आहे. इफ्फीमध्ये दहा मराठी सिनेमे दाखवून मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर मान दिला जातोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा