मराठा आरक्षणाच्या प्रतिज्ञापत्रासाठी वेळ मागितला नाही -मुख्यमंत्री

October 13, 2016 5:04 PM0 commentsViews:

cm devendra fadanvis413 ऑक्टोबर : मराठा आरक्षणासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सरकारने वेळ मागितला नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा आरक्षण प्रश्नी हायकोर्टाने सरकारला धारेवर धरलं. एवढंच नाही तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी शेवटची संधी असेल असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. मुंबई हायकोर्टात याबाबत आज सुनावणी झाली त्यात सरकारच्या वकिलाने तसंच इतर पक्षकारांनी प्रतिज्ञापत्रासाठी आणखी वेळ मागितला. पण असा वेळ किती वेळेस घेणार असं हायकोर्टाने सुनावलं. विशेष म्हणजे नंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारनं अशी कुठलीही वेळ मागितली नसल्याचं स्पष्ट केलं. पण सरकारच्या वकिलानं मात्र कोर्टात, मराठा जातीची नेमकी संख्या किती आहे याची सरकारकडे माहिती नसल्याचं म्हटलंय. त्यावर विरोधकांनी देवेंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. सरकार चालढकल करत असल्याचाही आरोप केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा