वांद्रे इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 6 वर

October 13, 2016 6:15 PM0 commentsViews:

beharampadaमुंबई, 13 ऑक्टोबर : मुंबईतील वांद्रे, बेहरामपाडा येथील चार मजली झोपडीवजा बांधकाम कोसळून सहा जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यात दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. दरम्यान, ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून अजून काही लोक ढिगा-याखाली असण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते आहे.

अनंत काणेकर मार्गावरील बेहरामपाडा परिसरात चारमजली झोपडीवजा बांधकाम करण्यात आलेली ही जागा रेल्वेच्या हद्दीत येते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हे बांधकाम अचानक कोसळले. त्यात जखमी झालेल्या 11 जणांना भाभा रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मात्र त्यातील उपचाराआधीच सहा जणांचा मृत्यू झाला. पाच जणांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू असून झुल्फेखान निसार खान आणि साखीया खान यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयांतून देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले. 10 कामगार आणि अग्निशमन दलाचे पथक यांच्यामार्फत शोध आणि मदतकार्य सुरू रात्री उशिरापर्यंत सुरू होते. एनडीआरएफ पथकाची एक तुकडी घटनास्थळी मदतीकरीता ठेवण्यात आली आहे.
मृतांची नावे
1) आयशा अकबर खान (12)
2) अलिनीसार अहमद खान (साडे तीन वर्षे)
3) ओसामा निसार खान (14)
4) हाबीबा निसार खान (दोन वर्षे)

5) आफिफा निसार खान (1)
6)रुसुदा निसार अहमद खान (16) 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा