सुशोभीकरणाचा वाद बिग बॉसेसपर्यंत

April 23, 2010 3:15 PM0 commentsViews: 1

विनोद तळेकर, मुंबई

शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा वाद आता थेट शिवसेना आणि मनसेच्या बिग बॉसेसपर्यंत पोहोचला आहे. या वादात आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उतरले आहेत.

शिवाजी पार्कच्या नागरिकांना विचारात न घेता हे सुशोभीकरण केले जात आहे, असा आक्षेप घेत मनसेने हे काम बंद पाडले. त्यावर सेनेने प्रतिष्ठेचा मुद्दा करत काहीही झाले तरी हे शिल्प उभारणारच, असा पवित्रा घेतला. आता तर थेट बाळासाहेबांनीच या भिंतीला विरोध करणार्‍यांना शिवाजी महारांना विरोध करणारे असे संबोधले आहे.

'सामना'च्या अग्रलेखात बाळासाहेबांनी या स्मारकाला विरोध करणार्‍यांना शिवाजी पार्कवरच आडवे करू, असा इशारा दिला. त्यावर राज यांनीही दमदार उत्तर दिले.

शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणावरून हे शाब्दिक युद्ध पेटले असतानाच या शिल्पाचे कामही वेगाने सुरू आहे. आता मनसेने या कामाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे भिंतीवरुन सुरू झालेली ही लढाई महापालिका निवडणुकीच्या युद्धात मोठा मुद्दा ठरणार हे नक्की.

close