शिल्पा शेट्टीच्या वडिलांना अखेरचा निरोप

October 13, 2016 7:22 PM0 commentsViews:

मुंबई,13 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे वडील सुरेंद्र शेट्टी यांचं निधन मंगळवारी हृदयविकारानं झालं. बुधवारी झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी बॉलिवूडचे अनेक मान्यवर हजर होते. अक्षय कुमार, रवीना टंडन, अभिषेक बच्चन असे अनेक स्टार्स शिल्पाचं सांत्वन करत होते. शिल्पानं इंस्टाग्रामवर वडिलांचे फोटोज शेअर केलेत. आणि एक संदेशही लिहिलाय. तिनं लिहिलंय, सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझे वडील हिरो होते. ते सच्चे आणि प्रामाणिक होते. आमच्या कुटुंबाचा एक आधार हरपला. पापा घर सोडून गेलेत, पण ते आमच्या हृदयातून गेलेले नाहीत. लव्ह यू डॅडी.. तुम्ही चांगले वडील, पती आणि मित्र होतात.’


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा