नील नितीन मुकेश-रुक्मिणीचा साखरपुडा

October 13, 2016 7:28 PM0 commentsViews:

13 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश हा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मुंबईतील रूक्मिणी सहाय हिच्यासोबत लवकरच तो विवाहबद्ध होणार आहे. नुकताच दसऱ्याचा मुहूर्त साधत मुंबईतल्या जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी या दोघांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय हजर होते. रूक्मिणी ही नागरी उड्डयन क्षेत्रात काम करते. नीलचं हे अरेन्ज्ड मॅरेज असून त्याच्या आई वडिलांनीच रूक्मिणीची निवड केलीये.

34वर्षांचा नील हा ज्येष्ठ गायक मुकेश यांचा नातू. साखरपुड्याआधी नील आणि रुक्मिणी महिनाभर एकमेकांना जाणून घेत होते. त्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतला.

अगदी जवळच्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याला नीलनं लाल आणि काळी शेरवानी घातली होती. तर रुक्मिणीनं गुलाबी आणि निळ्या लेहंगा परिधान केला होता. नितीन मुकेश या साखरपुड्यामुळे खुश आहे. ते म्हणाले की रुक्मिणी नीलसाठी परफेक्ट चॉइस आहे. ती साधी आणि तत्त्व जपणारी आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा