सूर्याचे क्लोजअप व्हिडिओ

April 23, 2010 3:38 PM0 commentsViews: 7

23 एप्रिल

नासाने सूर्याच्या अभ्यासाविषयीचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. याआधी कधीही लक्षात न आलेल्या विशिष्ट प्रकारच्या हालचाली सूर्याच्या कक्षेभोवती दिसून आल्या आहेत.

सूर्याची थक्क करणारी दृश्ये आपण यात पाहू शकतो. नासाच्या सोलार डायनामिक्स ऑब्झर्वेटरीतर्फे म्हणजेच एसडीओ या यानाने अवकाशातून सूर्याचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ शूट केले आहेत.

एसडीओने काढलेले हे फोटो सूर्याच्या आजवरच्या अभ्यासात महत्वाची भर घालू शकतात, असे नासाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. हे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही नासाच्या www.nasa.gov या वेबसाईटवर पाहू शकता.

close