राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पंडितअण्णा मुंडे यांचं निधन

October 13, 2016 9:27 PM0 commentsViews:

pandit_anna_mundeबीड, 13 ऑक्टोबर : भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंचे ज्येष्ठ बंधू आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंचे वडील पंडितअण्णा मुं़डे यांचं निधन झालंय. ते 77 वर्षांचे होते. गेल्या अनेक श्वसनविकाराच्या आजारामुळे ते त्रस्त होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात अतिशय महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व म्हणून पंडितअण्णांची ओळख होती. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही त्यांनी भुषवलं होतं. गेल्या काही वर्षांपासून त्यांना श्वसनाचा विकार ज़डला होता. परळीतल्या समर्थ रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. संध्याकाळी साडेसातवाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी दुपारी चार वाजता परळीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा