बायकोसाठी त्याने अॅमेझॉनचा 57 लाखांचा माल 40 हजारांत विकला

October 13, 2016 11:32 PM0 commentsViews:

13 ऑक्टोबर : पत्नीच्या प्रेमापोटी पती काय करू शकता याचा नेम नाही. पत्नीला दिवाळीची भेटवस्तू देण्यासाठी एका कंटेनर चालकाने अॅमेझॉन कंपनीचा 57 लाखांचा माल केवळ 40 हजारात विकल्याची घटना नागपुरच्या मिहान परिसरात घडली आहे.

amezon_nagpurनागपुरच्या सोनेगाव पोलिसांनी कंटेनर चालक सुदर्शन मेश्राम आणि त्याच्याकडून सामान विकत घेणाऱ्या बेग मुज्जफ्फर बेग याला अटक केली आहे. नागपूरच्या मिहानमध्ये ऑनलाईन सामान विकणारी आंतरराष्ट्रीय कंपनी अमेझॉनच गोडावून आहे. या गोडावून मधून देशभरात माल पाठवला जातो याच ठिकाणी एका ट्रान्सपोर्टरच्या कंटेनरवर सुदर्शन मेश्राम काम करत होता. त्यातच त्याला बायकोसाठी दिवाळीची खरेदी करण्यासाठी त्याने हया कंटेनरमधील टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप अशा महागड्या वस्तू फक्त चाऴीस हजार रुपयात विकून टाकल्या.अखेर त्याचं हे बायको प्रेम त्याला चांगलं महागात पडलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा