जाणून घ्या, केळी खाण्याचे फायदे

October 13, 2016 11:44 PM0 commentsViews:

Banana chips on a bowl.Banana SmoothieBananas
बाराही महिने मिळणारं फळ म्हणजे केळं. हिरवी केळी, पिवळी केळी, वेलची केळी, लाल केळी असे केळ्याचे प्रकार आहेत. केळं मूळचं भारत आणि मलाया इथलं. युरोपात पौराणिक काळात केळ्याला स्वर्गातलं सफरचंद म्हणत. पाहू या केळ्याचे फायदे

1. केळ्यानं शरीराला उर्जा मिळते. एक मोठे केळं 100हून अधिक कॅलरीज देतं. केळ्यानं थकवा नाहीसा होतो.
2. पोट बिघडलं असेल तर केळ्यानं आराम पडतो.
3. बद्धकोष्ठतेवरही केळं उपयोगी आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळ्यानं आराम पडतो.
4. आव पडत असेल तर केळं कुस्करून खावं.
5. केळ्यात लोहाचं प्रमाण भरपूर असतं. ऍनिमिया असेल केळं फायदेशीर. केळ्यानं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं.
6. मूत्रपिंडाच्या विकारावरही केळं खाणं चांगलं असतं. केळ्यात प्रथिनं आणि क्षार कमी असतात. पिष्टमय पदार्थांचं प्रमाण खूप असतं.
7. क्षयावर केळं रामबाण औषध आहे.
8. मासिक पाळीच्या वेदनेवर उकडलेलं केळफुल आणि दही गुणकारी ठरतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा