मराठा आरक्षणाची मोदींकडे मागणी करून पवारांची प्रदेश भाजपवर कुरघोडी

October 13, 2016 11:58 PM0 commentsViews:

13 ऑक्टोबर : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची हायकोर्टात कसोटी लागलीये. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन राज्यातील भाजप सरकारवर कुरघोडीचा प्रयत्न केलाय. पवारांच्या या मोदी भेटीमुळे प्रदेश भाजपची चांगलीच अडचण झालीये.pawar meet cm

मराठा आरक्षणाचा राग शांत करण्यासाठी इकडे राज्यातलं भाजप सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मात्र, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत आपण मराठा आरक्षणाची मागणी केल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय.  मुख्यमंत्र्यांना जेव्हा मोदी पवारांच्या भेटीबाबत पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली हे मला माहित आहे. पण, त्यांच्या काय चर्चा झाली हे मला माहित नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. पण, पत्रकारांनी पवारांनी मराठा आरक्षणावर चर्चा केली असं निदर्शनास आणून दिलं असं सांगितल्यावर आता चर्चा झालीही असेल असं म्हणून पुढं बोलण्याचं टाळलं. विशेष म्हणजे मराठा आरक्षण देण्यासाठी फडणवीस सरकार चालढकल करत आहे असा आरोप अलीकडे शरद पवारांनी केला होता. त्यामुळे पवारांच्या या भेटीमुळे आणि मुख्यमंत्री बॅकफूटवर पडल्याचं चित्र आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा