ईबीसी सवलत आता सहा लाखांपर्यंत

October 14, 2016 8:43 AM0 commentsViews:

cm_Abad4324

14 ऑक्टोबर :  राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना यंदापासून विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली असून, आता सहा लाख रुपयांपर्यंत ईबीसी सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्यात काढण्यात येत असलेल्या मराठा मोर्चात ईबीसी सवलत 6 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणीही होत होती. याची दखल घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे.   सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना ही योजना लागू असेल. त्याचा लाभ सर्वच विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहिती मुख्यमंत्रींनी दिली आहे.

त्यात मेडिकल, इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसह व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसंच अल्पभूधारक शेतकरी, आदिवासींच्या मुलांसाठी प्रति फी फुर्ती योजना, तशाच शिष्यवृत्ती घोषीत करण्यात आलीय. त्यामुळेच जिल्हा तसच मोठ्या शहरांमध्ये ह्या विद्यार्थ्यांना राहून शिक्षण घेणं सोपं होईल असं मुख्यमंत्र्यांना वाटतंय. त्याचबरोबर भरमसाठ कॉलेजला सरकार परवानगी देणार नाही. महाविद्यालयांना यापुढे प्लेसमेंटही करावे लागेल, असंही त्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा