नाशिकमध्ये जनजीवन पूर्वपदावर; शाळा, कॉलेज, बससेवा सुरू

October 14, 2016 9:58 AM0 commentsViews:

Nashik Bus Stand

14 ऑक्टोबर : हिंसक कारवायांच्या पार्श्वभूमीवर आठ गावांमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी  आज (शुक्रवारी) दुपारी बारानंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. तसंच मोबाइल इंटरनेट सेवा उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव इथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर शहरासह जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर चार दिवस हिंसाचाराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात  घडल्या. त्यामुळे अफवांना पेव फुटले आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

जिल्ह्यातील सर्व 9 गावातील संचारबंदी शिथिल होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी 54 संशयितांना अटक केली असून, 81 जणांचा शोध घेणं सुरू आहे. मुंबईसह बाहेरगावी जाणारी एस टी बससेवा सुरू झाली असून गेले चार दिवस बंद असलेली मोबाइल इंटरनेट सेवेवर लावण्यात आलेले निर्बंधही उठवण्यात येणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा