26/11च्या हल्ल्यात जिगरबाज कामगिरी करणारा ‘सिझर’चा मृत्यू

October 14, 2016 11:47 AM0 commentsViews:

CuqJ0ekVYAAUOOf

14 ऑक्टोबर :  मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या श्वान सिझर मृत्यू झालाय. विरारमधल्या फिझा फार्मवर सीझर चा मृत्यू झाला.  26/11 च्या हल्ल्यात सिझरनं ताज हॉटेल, सीएसटी स्टेशन इथं जिवंत ग्रेनेड शोधलं होतं.

सिझरवर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  ट्रेनर पोलीस नाईक संतोष भोगले आणि सीझरला दत्तक घेणार्‍या फिझा शहा यांनी त्याला अखेरचा निरोप दिला.

2004 साली जन्मलेला ‘सीझर’ 3 महिन्यांचा असतानाच बॉम्बशोधक पथकात सामील झाला. 2013 ला तो निवृत्त झाला. मुंबईत 2007 साली रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट आणि 2011चा पंचरत्न हॉटेलात झालेल्या स्फोटातील शोधकार्यात सिझरनं महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

10 वर्ष अखंड सेवा केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांचा हा कर्तबगार हिरोनं कायमची विश्रांती घेतली. 3 महिन्याचा असल्यापासून सिझर हा मुंबईतील बॉम्बशोधक  आणि नाशक पथकात दाखल झाला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा