मोदींवर राजीनाम्यासाठी दबाव

April 24, 2010 7:42 AM0 commentsViews: 1

24 एप्रिल

आयपीएल कमिशनरपदाचा राजीनामा देण्यासाठी ललित मोदी यांच्यावर दबाव येत आहे. पण मी अजून राजीनामा दिलेला नाही. पाच दिवसांचा माहिती मागितलाआहे, असे मोदींनी स्पष्ट केले आहे.

याबाबत त्यांचे बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशीही फोनवरून बोलणे सुरू आहे. सध्या मुंबईत बीसीसीआयची बैठक सुरू आहे. त्यात मोदींच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू आहे.

मोदींच्या राजीम्यानंतर आयपीएलचे पुढचे कमिशनर कोण, याविषयी बैठकीत चर्चा झाली आहे. त्यातून रवी शास्त्री यांचे नाव पुढे येत आहे. असे असले तरी आयपीएलच्या उपाध्यक्षपदावर राहण्याची मोदींची इच्छा आहे.

close