फलटणमध्ये संविधान समर्थन मोर्चा

October 14, 2016 12:40 PM0 commentsViews:

PhaLTAN  morcha14 ऑक्टोबर : फलटण तालुक्यात धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्या साधुन आज (शुक्रवारी) संविधान समर्थन मोर्चा काढण्यात आला आहे. आंबेडकर चौकापासून या मोर्चाला सुरूवात करण्यात आली.

या देशात अॅट्राॅसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, आधीचे आरक्षण अबाधित ठेवून मराठा, मुस्लीम आणि धनगर समाजांना आरक्षण देण्यात यावं, तसंच खैरलांजी ते कोपर्डीच्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागण्या या मोर्च्याच्या निमित्ताने केल्या जात आहेत. त्याचबरोबर, दोभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर अटक करून शिक्षा व्हावी अशा अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा