पुणे मेट्रोला अखेर पीआयबीकडून मंजुरी

October 14, 2016 2:14 PM0 commentsViews:

Pne metro123

14 ऑक्टोबर : पुणेकरांचं मेट्रोमधून प्रवास करण्याचं स्वप्न पूर्ण होण्यातला आणखी एक अडसर दूर झाला आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडच्या मेट्रो प्रकल्पाला पीआयबी अर्थात सार्वजनिक गुंतवणूक बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता हा प्रस्तवा अंतिम मंजुरीसाठी केंदीय मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल.

दिल्लीत झालेल्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. पीआयबीच्या मंजुरीनंतर मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे.  राज्यातील सर्वात जास्त काळ रखडलेला पुणे मेट्रोचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. मेट्रो भुयारी की जमिनीवरील तसंच यामुळे होणारी पर्यावरण हानी अशा अनेक वादांमुळे पुण्याची मेट्रो रखडली आहे. त्यामुळे मेट्रोचा खर्चही कित्येक कोटींच्या घरात पोहोचला आहे. मात्र, आज झालेल्या पीआयबीच्या बैठकीत या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याने अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा 20 टक्के खर्च केंद्र सरकार, 20 टक्के राज्य सरकार, 10 टक्के पुणे महानगरपालिका, आणि 50 टक्के कर्ज अशी खर्चाची विभागणी केली आहे.

दरम्यान, या मेट्रो प्रकल्पाच्या मंजुरीने भाजपला आगामी महापालिका निवडणुकीत प्रचाराचा नारळ फोडण्याची संधीच मिळाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा