औरंगाबादमध्ये अनधिकृत घरांची संख्या वाढली

April 24, 2010 7:56 AM0 commentsViews:

शेखलाल शेख, औरंगाबाद

24 एप्रिल

औरंगाबादमध्ये अनधिकृत घरांची संख्या वाढत आहे. गुंठेवारीतील घरे नियमित न झाल्याने त्याचा फटका जवळपास तीन लाख लोकांना बसला आहे.

आता या जागा नियमित करण्यासाठी महापालिकेने मिशन गुंठेवारी अभियानाला सुरुवात केली होती. पण योजनेला खिळ बसली आहे. शहरात आजही 2001 पूर्वीची 33 हजार घरे अनधिकृत आहेत.

गुंठेवारीतील घरांना कुठल्याही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. नागरिकांनी वारंवार प्रयत्न करूनही ही घरे अधिकृत होत नाहीत. 2001 नंतर बांधलेली घरे नियमित करण्यासाठी गुंठेवारीचा कायदा आड येत आहे.

अशी एकूण 60 हजार घरे गुंठेवारीत येतात. महापालिकेच्या आकडेवारीनुसार निवासी क्षेत्रात 118 वसाहती असून त्यात 20 हजार 582 घरे येतात. 246 अनधिकृत वसातहतींमध्ये 45 हजार 171 घरे आहेत.

2001 नंतर बांधलेल्या घरांच्या फाईल्स महापालिकेने रद्द केल्या आहेत.

close