हे कितपत योग्य ?,महादेव जानकरांवर मुख्यमंत्री नाराज

October 14, 2016 4:39 PM0 commentsViews:

cm_on_jankar3314 ऑक्टोबर : भगवानगडावरील भाषणात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या भाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नाराज आहेत. मी तुमच्यासोबत असताना माझ्या विरोधात विधान करणे हे कितपत योग्य आहे असा सवालच मुख्यमंत्र्यांनी जानकरांना विचारलाय.

भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या मेळाव्यात राज्यमंत्री महादेव जानकर यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. धनंजय मुंडेंवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा लॉयल चमचा अशी टीकाही जानकरांनी केली होती. एवढंच नाहीतर भगवानगडावरील भाषणात जानकरांनी मंत्रिपदं कुणी दिली? असं वक्तव्य केलं होतं. आता हे वक्तव्य मुख्यमंत्र्यांना चांगलंच खटकलंय. आपण कायम मदतीसाठी तुमच्यासोबत असताना माझ्या विरुद्ध विधान कारण कितपत योग्य आहे असा सवालच मुख्यमंत्र्यांनी जानकरांना विचारलाय. मुख्यमंत्र्यांचा लॉयल चमचा या वक्तव्याबाबतही मुख्यमंत्री नाराज झालेत. भगवानगडावरील भाषणावेळी तिथे हजर असलेल्या एका मंत्र्यांने मुख्यंमत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी या मंत्र्याकडे व्यक्त केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा