पाक कलाकारांच्या सिनेमांना थिएटरमध्ये नो एंट्री !

October 14, 2016 7:11 PM0 commentsViews:

favad_thi14 ऑक्टोबर : महाराष्ट्र,गुजरात आणि गोवा या 3 राज्यांमध्ये पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे रिलीज करायला सिने थिएटर्स असोसिएशनने विरोध दर्शवलाय. असोसिएशनच्या बैठकीत पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे रिलीज न करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.

एकिकडे पाकिस्तानी दहशतवादी भारतीय जवानांवर हल्ले करत असताना पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे इथे रिलीज करणं योग्य नसल्याचं असोसिएशनच्या सदस्यांनाही वाटतंय. मात्र प्रोड्युसर्स गिल्डने असोसिएशनचा हा निर्णय दुदैर्वी असल्याचं म्हटलंय. या निर्णयामुळे दडपशाही करणाऱ्या राजकीय पक्षांचं फावणार असून त्याची झळ उद्या संपूर्ण इंडस्ट्रीला सहन करावी लागेल असं म्हटलंय. धर्मा प्रोडक्शनने पत्रक काढून आपली भूमिका मांडलीय. ‘ए दिल है मुश्किल’ हा सिनेमा सेन्सॉरसंमत असल्याने नियमानुसार रिलीज होणं हा आपला हक्क असल्याचं म्हटलंय. हा सिनेमा 28 ऑक्टोबरला रिलीज करण्यावर धर्मा प्रोडक्शन ठाम आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा