नॅशनल पार्कमधील सुरक्षा हायटेक

April 24, 2010 9:07 AM0 commentsViews: 5

उदय जाधव, मुंबई

24 एप्रिल

मुंबईत नॅशनल पार्कमधील लायन सफारीमध्ये, मंगळवारी एका सुरक्षा रक्षकाला सिंहाने ठार केले होते. त्यामुळे आता नॅशनल पार्कमधल्या लायन आणि टायगर सफारीची सुरक्षा हायटेक करण्यात येणार आहे.

नॅशनल पार्कमधील टायगर आणि लायन सफारीमधील सुरक्षा व्यवस्था आता हायटेक करण्यात येणार आहे. सफारीमधील गेटवर ॅइलेक्ट्रॉनिक सेन्सरसोबत सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसवण्यात येणार आहेत.

एकंदरीत नॅशनल पार्कमधील सुरक्षाव्यवस्था बदलण्याची गरज होती, हे आता प्रशासनानेही मान्य केले आहे. फक्त आता ही हायटेक यंत्रणाकुठलीही दुदैर्वी घटना घडण्यापूर्वी बसवली जावी, एवढी अपेक्षा आहे.

close