कुख्यात गुंड बाबा बोडकेचा मुख्यमंत्र्यांसोबत फोटो

October 14, 2016 8:25 PM0 commentsViews:

पुणे, 14 ऑक्टोबर : पुण्यात कुख्यात बाबा बोडके टोळीचा म्होरक्या बाबा बोडके ज्याच्यावर 4 खून आणि 12 गुन्हे दाखल आहे असा हा गुंड राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटोवर झळकला आहे. एवढंच नाहीतर बाबा बोडकेचा फोटो भाजपच्या बॅनरवरही झळकला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांसोबतच एका गुंडाचा फोटो समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

baba_bodke_cm_photo‘भाजप हा गुंडांचा पक्ष नाही’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील अधिवेशनात केला होता. पण आता भाजपच्याच बॅनरवर कुख्यात गुंडाचा फोटो झळकलाय. खुद्द या गुंडानेच मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेण्यात आली आहे. या भेटीदरम्यान हा फोटो काढण्यात आल्याचं कळतंय. पुणे आणि परिसरात बोडके टोळीची प्रचंड दहशत आहे. जमिनीच्या व्यवहारात बोडके टोळी सक्रीय आहे. त्याच्यावर 4 खून आणि 12 गुन्हे दाखल आहे.

एवढंच नाहीतर पुण्यात भाजपच्या नवरात्रीच्या एका बॅनरवरही बोडकेचा फोटो आहे. हे बॅनर सोमेश्वरवाडी प्रभाग 1 मध्ये लावण्यात आले होते. विशेष म्हणजे भाजपचे सदस्य निलेश निम्हण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बाबा बोडकेनं प्रमुख पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. याआधीही राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबत बाबा बोडकेचा फोटो झळकला होता.

या फोटोमुळे विरोधकांनी भाजप सरकारवर सडकून टीका केलीये. मुख्यमंत्र्यांना बोडकेचा इतिहास माहित नाही का? भाजपचं काँग्रेसीकरण होतंय. भाजपला फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत अशी टीका कुमार सप्तर्षी यांनी केली. तर राज्यातले सर्व सर्व माफिया भाजपसोबत असून राज्याल्या सर्व गुंडांना भाजप जवळ करतेय असा आरोप राष्ट्रवादीचेनेते नवाब मलिक यांनी केलाय. तसंच बोडकेसारखा माणूस मुख्यमंत्र्यांसोबत हे धक्कादायक आहे. वर्षा बंगल्यावर गुंडांना मोकळीक आहे का ? असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा उपस्थित केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा