पश्चिम घाटात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होणार

April 24, 2010 9:22 AM0 commentsViews: 28

24 एप्रिल

पश्चिम घाटात आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होणार आहे. आतापर्यंत या परिसरात वाघाचे अस्तित्व आहे, अशी माहितीच फक्त पुढे येत होती.

पण आता वनविभागाने वाघ कॅमेर्‍यात बंदीस्त केला आहे. याआधी वाघांचे ठसे, आणि त्यांच्या विष्ठेवरून वाघांची संख्या 9 असल्याचे वनविभागाने सांगितलं होते.

पण या छायाचित्रांमुळे पश्चिम घाटातील वाघाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.

close