यंदा मान्सून 98 टक्के

April 24, 2010 9:33 AM0 commentsViews: 2

24 एप्रिल

दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईला सामोरे जाणार्‍या नागरिकांना आणि शेतकर्‍यांना हवामान खात्याने दिलासा दिला आहे.

येत्या वर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनची सरासरी 98 टक्के असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

यात फार तर 5 टक्क्यांचा फरक पडू शकतो, असे हवामान खात्याचे महासंचालक अजित त्यागी यांनी सांगितले.

close