कोल्हापुरात भगवं वादळ, मराठा समाजाचा विराट मोर्चा

October 15, 2016 12:18 PM0 commentsViews:

kolahpur_morcha15 ऑक्टोबर : छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरनगरीत आज एक मराठा लाख मराठाचा एल्गार पाहण्यात मिळतोय. ‘यावचं लागतंय’ अशा कोल्हापुरी स्टाईलमध्ये मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज अपेक्षेप्रमाणे लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मोर्च्यात सहभागी झालाय. शहराला भगवमय स्वरुपप्राप्त झालंय.

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा, ऍट्रॉसिटी कायद्यात बदल आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक मोर्च्याच आयोजन करण्यात आलंय. सकाळी 10 त्या सुमारास ताराराणी चौक, गांधी मैदानसह 6 ठिकाणांहून हा मोर्चा निघाला. गेल्या महिन्याभरापासून या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरातल्या मोर्चांच्या गर्दीचा उच्चांक आज कोल्हापूरमध्ये मोडला जाण्याची शक्यता आहे. या मोर्च्याची ऐतिहासिक दसरा चौकामध्ये या मोर्चाची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे आजच्या मोर्चामध्ये कोल्हापूरसह बेळगाव सीमाभागातले मराठा बांधवही सहभागी झाले आहे. त्याचबरोबर सांगली सातारा आणि कोकणातले मराठा समाजही या मोर्च्यात सहभागी झाले आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसलेही आजच्या या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. सुमारे 10 हजार स्वयंसेवकांची फौज या मोर्चासाठी तयार असून पहाटे 5 पासून संध्याकाळी 5 पर्यंत शहरात कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाहीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा