बीडमध्ये दलित समाजाचा एल्गार

October 15, 2016 12:30 PM0 commentsViews:

15 ऑक्टोबर : राज्यात मराठा समाजाने अॅट्राॅसिटी कायदा रद्द करावा या मागणीसह इतर मागण्या करिता भव्य मोर्चे काढले जात आहे. याच मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये दलित ऐक्य मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येनं दलित बांधव एकत्र येऊन शांततेत हा मोर्चा पार पडला.dalit_morcha434

शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मूक मोर्च्याला सुरुवात झाली होती. अॅट्रोसिटी कायदा हा रद्द करावयाचा नाही या प्रमुख मागणीसह इतर मागण्याकरिता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात सर्व दलित संघटना, सर्व राजकीय पक्षातील दलित नेते, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.  अत्यंत शिस्तीत हा मोर्चा संपन्न झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा