समाजात जातीची पकड घट्ट होतेय ?-भालचंद्र नेमाडे

October 15, 2016 12:52 PM0 commentsViews:

nemade33315 ऑक्टोबर : समाजात जातीची पकड घट्ट होतेय की काय अशी भीती ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलीय. ते जर्मन रहिवास ह्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते.

मुंबईत `जर्मन रहिवास` या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. 1922 ते 1925 या काळातले जर्मनीचे अनुभव या पुस्तकात आहेत. मॅक्समुलर भवन मुंबईच्या समन्वयक जयश्री जोशी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं तर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लोकवांड्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलंय. यावेळी नेमाडेंनी जर्मन समाज आणि भारतीय समाजातल्या मानवतावादाचा फरकही विषद करून सांगितला आणि आपल्याकडे सध्या सगळीकडे जातीयवाद वाढल्याचीही खंत व्यक्त केली.

सभा संमेलनामध्ये मानवता वाद असतो तो खरा नसतो. टीएडीए घेऊन मानवता वाद करणारे आपल्याकडे खूप बोकळलेले आहे. या गोष्टीमुळे जाती आणि राष्ट्रवाद चांगला होता की काय असं लोकांना वाटू लागलंय अशी भीती नेमाडेंनी व्यक्त केली.
एवढंच नाही तर इतिहास हा बहुतांश खोटेपणानेच लिहिला जातो आणि सध्या देशात राष्ट्रीय उन्माद आलाय असंही नेमाडे म्हणाले. विशेष म्हणजे सध्या सगळीकडे पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा केली जातेय. त्यावर बोलताना युद्ध हा राजकारण्यांचा धंदा असल्याची टीकाही नेमाडेंनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा