आता सोसायटीच्या अध्यक्षांनाही करावे लागणार निवडणुकीसाठी काम !

October 15, 2016 2:28 PM0 commentsViews:

voter-slip15 ऑक्टोबर : तुम्ही जर तुमच्या सोसायटीचे अध्यक्ष किंवा सचिव असाल, तर तुमचं काम वाढणार आहे. घाबरू नका.. काम चांगलं आहे. आता निवडणूक प्रक्रियेत सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांना हातभार लावावा लागणार आहे.

येत्या काळात अनेक महापालिका, नगरपालिका, जिल्हामध्ये निवडणुका आहेत. त्यासाठी आपल्या गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना मतदान करायला लावणे, निवडणुकी संदर्भात होणाऱ्या बैठकांना उपस्थित राहणे, सोसायटीतल कुणी सज्ञान झालं, कुणाचं निधन झालं, नवीन रहायला आलं किंवा सोडून गेलं, तर अध्यक्ष किंवा सचिवाला ते मतदान नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन कळवण्याचं काम करावं लागणार आहे. निवडणुकीसंदर्भात होणा•या बैठकांना उपस्थित राहण्याबरोबरच नजिकच्या काळात होणाऱ्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्येही आपल्या सोसायटीतून जास्तीत जास्त मतदान होईल यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्यात सध्या एक लाख दोन हजार 480 सहकारी गृहनिर्माण संस्था असून त्यांची सदस्य संख्या 22 लाख 70 हजार आहे. सहकार विभागाने यासंदर्भात शासन निर्णय काढून गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा