राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी! नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची हजेरी

October 15, 2016 3:14 PM0 commentsViews:

narendra_maharaj_program15 ऑक्टोबर : कुख्यात गुंड बाबा बोडकेसोबत फोटोमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वादात सापडले होते. आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वंयघोषित जगतगुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावलीये. मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाच्या उपस्थितीवर अंनिसने नाराजी व्यक्त केलीये.

वादग्रस्त असलेले नरेंद्र महाराज यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी नाणिज येतील मठात हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी आहे असं वक्तव्य केलं. मुख्यमंत्री म्हणता, “आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. राजसत्तेमध्ये कुणावर तरी राज्य करतो असा भाव आहे. कुणी तरी राजा आणि कुणी तरी प्रजा असा भाव आहे. धर्मसत्तेमध्ये एकच भाव आहे आणि त्यागाचा भाव आहे.”अर्थातच मग प्रश्न असा निर्माण होतो की, महाराष्ट्राच्या ज्या जनतेनं सरकार निवडून दिलं, त्यांच्या मताची काहीच किंमत नाही का?

मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमात उपस्थितीवर अंनिसने आक्षेप घेतलाय. मुख्यमंत्री हे राज्याच्या मोठ्या पदावर आहे. अशावेळी त्यांनी अशा महाराजाच्या कार्यक्रमात हजेरी लावणे हे दुदैर्वी आहे. नरेंद्र महाराजांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहे. मुख्यमंत्री जर राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी आहे असं म्हणत आहे तर ते निषेधार्ह आहे अशी टीका अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केलीये. तर हिंसा आणि गैरव्यवहार प्रकरणात नरेंद्र महाराजाचा नावं याआधीही पुढे आलंय. एवढंच नाहीतर या महाराजांची चमत्कार करण्याचा दावा केला होता. अशा महाराजाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावणे याचा खेद वाटतो अशी संतप्त प्रतिक्रिया मुक्ता दाभोलकर यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा