पैशावाल्यांची आंदोलनं मोठी होतात -राजकुमार बडोले

October 15, 2016 3:43 PM0 commentsViews:

rajkumar_badole15 ऑक्टोबर : आज कुणी पण येतं आणि आरक्षण द्या अशी मागणी करतंय. आंदोलनाची भाषा वेगळी आहे, पैसा असल्यामुळे त्यांची आंदोलनही मोठी होत आहे असं वक्तव्य राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलंय. मराठा आंदोलनावरील टीकेमुळे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

औरंगाबादमध्ये बुद्धिस्ट फेस्टिव्हलमध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मराठा क्रांती मोर्च्याचा उल्लेख न करता टीका केलीये. आज कुणी पण येतं आणि आरक्षण द्या अशी मागणी करतंय. आंदोलनाची भाषा वेगळी, पैसा असल्यामुळे त्यांची आंदोलनही मोठी होत आहे. मी महाराष्ट्राचा सामाजिक न्यायमंत्री आहे पण मनापासून बोलतो. जे कोपर्डी घडलंय त्याचा आम्ही निषेध करतो. पण अशा प्रकरणातून अनुसुचित जातीच्या व्यक्तींवर जर अन्याय होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशाराच बडोले यांनी यावेळी दिला. तसंच अनुसुचित जातींवर जर अन्याय झाला तर वेळेप्रसंगी सामाजिक न्यायमंत्रिपदाचा राजीनामा देईल असंही बडोलेंनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान, विरोधकांसह खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे यांनीही बडोलेंच्या हकालपट्टीची मागणी केलीये. उद्या राज्यात सामाजिक सलोखा बिघडला तर त्याला बडोलेंसारखेच मंत्री जबाबदार असतील, अशा इशाराच उदयनराजेंनी दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा