राज्यात बरं वाईट घडल्यास बडोले जबाबदार,उदयनराजेंचा इशारा

October 15, 2016 3:57 PM0 commentsViews:

Udayan raje bhosll21315 ऑक्टोबर : मराठा मोर्चे शांततेत सुरू आहे. पण राजकुमार बडोले यांनी वक्तव्य करून वाद निर्माण केलाय. उद्या जर महाराष्ट्रात विपरित घडलं तर त्याला बडोले जबाबदार राहतील असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलाय. तर बडोलेंची हकालपट्टी करा अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलीये.

कुणीही येतं आणि आरक्षण द्या अशी मागणी करत. पैशावाल्यांची आंदोलनं मोठी होत आहे अशी टीका सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती. त्यांच्या वक्तव्याचा मराठा समाजातून निषेध केला जात आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केलीये. अशा लोकांचं नाव घेऊन मी त्यांना मोठं करणार नाही. उलट त्यांची मला किव येते. आज लाखोंच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यांची भावना समजून घेण्याची गरज आहे. पण ही लोकं त्यांची थट्टा करत आहे. उद्या महाराष्ट्रात काही घडलं तर त्याला बडोले जबाबदार असतील असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला.

तर मराठा मोर्चे शांतपणे सुरू आहे. या मोर्चांचा आदर्श समाजासमोर मांडला जातोय. पण अशा वेळी सामाजिक न्यायमंत्री असे विधान करताय. त्यांची हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा