‘इरादा पक्का’चा प्रिमियर धुमधडाक्यात

April 24, 2010 9:56 AM0 commentsViews: 5

24 एप्रिल

केदार शिंदे दिग्दर्शित इरादा पक्का हा विनोदी सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाचा प्रिमियर धुमधडाक्यात पार पडला.

बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव ही जोडी पुन्हा एकदा या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.

तब्बल पावणे दोन वर्षांनी केदारचा मराठी सिनेमा रिलीज होत असल्याने इरादा पक्काची उत्सुकता सगळ्याच आमंत्रितांमध्ये दिसत होती.

आजच्या तरुण विवाहीत जोडप्यांची गोष्ट मांडणारा हा सिनेमा पहाताना अनेक रिअल लाईफ कपल्सही भारावून गेले होते.

यात भर घालत होते ते सिनेमातील कलाकार सोनाली आणि सिद्धार्थ. खुद्द केदारही या अनुभवाने सुखावलेला दिसत होता.

प्रिमियरच्या निमित्ताने सेलिब्रिटीजनी तरी सिनेमाचे कौतुकच केले. पण सर्वसामान्य प्रेक्षक स्वतःचे पैसे खर्च करून केदारचा हा सिनेमा पहाण्याचा इरादा पक्का करत आहेत का हे पाहायचे…

close