गव्हाच्या गोडाऊनमध्ये साठवली दारू

April 24, 2010 10:07 AM0 commentsViews: 2

24 एप्रिल

लुधियानामध्ये शेकडो टन गहू सडतोय. गोडाऊनमध्ये गव्हाच्या ऐवजी दारू साठवली जातेय. लुधियानाच्या राज्य गोदाम महामंडळाच्या बाहेर गहू उघड्यावर सडतोय. त्याचवेळी गोडाऊनच्या आतमध्ये दारुचे बॉक्स सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

हे बॉक्स एका खाजगी कंपनीचे आहेत. आणि त्यांनी गोडाऊन भाड्याने घेतले आहे.

हे गोडाऊन गहू साठवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही, कारण याआधी यात खते ठेवण्यात आली होती, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

फुड कार्पोरेशन ऑफ इंडियाला पहिल्यांदा गोडाऊन भाड्याने घेण्याचा प्रस्तावही दिल्याचे या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. आता पंजाबमध्ये गव्हाचा हंगाम आला आहे. तयार झालेला लाखो टन गहू या गोडाऊनमध्ये साठवण्यासाठी येईल.

पण गोडाऊनमध्ये गहू ठेवायला जागाच नाही. कारण गोडाऊन हे दारूच्या बॉक्सेसने भरले आहे.

close